---Advertisement---

शिंदे गटातील आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत; शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला केली मारहाण

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे, वादग्रस्त कृतीमुळे कायम चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, ठेकेदाराचे कॅन्टीन बिल पास न केल्याचा रागातून संतोष बांगर यांनी तंत्रनिकेतनच्या प्राचार्य उपाध्याय यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधी आमदार संतोष बांगर हे पिकवीमा कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे चिडलेल्या बांगर यांनी पिकवीमा कार्यालयात तोडफोड केली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!