मुंबई : IPL च्या दृष्टीने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IPL संदर्भात Reliance Jio ने एक घोषणा केली आहे. जिओ ने सांगितले आहे की, IPL २०२३ आता jio cinema वर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहे. ३१ मार्चपासून सुरु होत असलेल्या आयपीएल २०२३ चा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या टीममध्ये होणार आहे. jio cinema वर सर्व आयपीएलचे सामने 4K रिझोल्यूशनमध्ये ऑनलाइन स्ट्रीम केले जाणार आहेत. या आधी फक्त IPL केवळ Disney+ Hotstar वरच स्ट्रीम केले जात होते आणि यासाठी तुम्हाला सब्स्क्रिप्शन घ्यावे लागत होते.
JioCinema वापरकर्ते १२ भाषांमध्ये सामने बघू शकणार आहेत. वापरकर्ते इंग्रजी, तामिळ, हिंदी, तेलगू, मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी यासह अनेक भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकतील. भाषांमध्ये बदल केल्याने केवळ कॉमेंट्री नाही तर निवडलेल्या भाषेतील ग्राफिक्स आणि डायग्राम देखील बदलतील.
FIFA World Cup2022 Multicam फीचरसह Jio Cinema वर वापरकर्ते सर्व ७४ सामन्यांदरम्यान कॅमेरा अनेक अँगलमध्ये स्विच करू शकणार आहेत. Jio phone वापरकर्ते IPL २०२३ मोफत पाहू शकणार आहेत कारण या फिचर फोनमध्ये आधीपासूनच Jio Cinema सपोर्ट उपलब्ध आहे. अॅपच्या मदतीने वापरकरते फोनवरच स्कोअर आणि पिच हीट मॅप सारखी आकडेवारी बघू शकणार आहेत. मोठ्या स्क्रीन म्हणजेच टीव्हीवर सामना पाहणारे वापरकर्ते पूर्ण माहितीसह सामना बघू शकणार आहेत.