---Advertisement---

मुरूम येथे काका चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Follow Us:
---Advertisement---

मुरूम : येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने काका चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी रोजी करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरण पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संगिता कडगंचे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रफीक तांबोळी, पंचायत समिती माजी सभापती मदन पाटील, सचिन पाटील, प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर पवार, उमरगा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश राठोड, नगरसेवक विक्रम मस्के, महेश माशाळकर, बाबा मस्के, विकासेसोचे चेअरमन दत्ता चटगे, माजी नगराध्यक्षा अनिता अंबर, रशीद शेख, धनराज मंगरुळे, व्यकंट जाधव गुरूजी, प्रा. डॉ. शौकत पटेल, आयुब लदाफ, याकूब लदाफ, प्रमोद कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

काका चषक क्रिकेट स्पर्धेत प्रथम विजेत्या संघाला २ लाख ११ हजार ४४४ रुपयांचे, द्वितीय येणाऱ्या संघास १ लाख ११ हजार ४४४ रुपयांचे द्वितीय पारितोषिक तर तृतीय येणाऱ्या संघास ५१ हजार ४४४ रुपयांचे पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रारंभी भुसणी येथील बजरंग क्रिकेट क्लब विरुद्ध लोहाराच्या किंगकोब्रा क्रिकेट क्लब यांच्यात पहिला सामना पार पडला. क्रिकेट मैदानावर प्रेक्षकांना पाहण्यासाठी उत्तम व चांगली व्यवस्था करण्यात आली आहे.

मुरूम शहर काँग्रेस व श्री शरणजी पाटील मिञ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. क्रिकेट सामना पाहण्यासाठी शहर व परिसरातील क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!