---Advertisement---

नुसते पंचनामे नको; आता प्रत्यक्षात मदत हवी ; युवा नेत्या शीतल म्हेत्रे यांची मागणी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२१ : नुसते आता पंचनामे नको, प्रत्यक्षात मदत देखील हवी अशा प्रकारची मागणी अक्कलकोट महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शीतल म्हेत्रे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे किंवा ज्या भागात गारपीट झाले आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करावी, अशी मागणी आमची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सलग दोन दिवस अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती त्यामध्ये द्राक्ष, टरबूज, पपई, यासारख्या फळबागांना याचा मोठा फटका बसला आहे. तर या हंगामातील ज्वारी, गहू ,हरभरा, या रब्बी पिकांना सुद्धा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर पुन्हा निसर्गाने संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर आपण काढला पाहिजे आणि त्यांना आर्थिक धीर दिला पाहिजे. त्यामुळे अधिक वेळ न जाता तात्काळ अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तहसीलदार सिरसट यांची भेट घेऊन म्हेत्रे यांनी निवेदन दिले.

यावेळी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुबारक कोरबु, लाला राठोड, विश्वनाथ हाडलगी, शिवशरण इचगे अल्लिबाशा आत्तर,मतीन पटेल, रामचंद्र समाणे, काशिनाथ कुंभार, वसंत देडे, राहुल बकरे,विकी कोरे, मंगेश फुटाणे,बबन पवार आदी शेतकरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!