अक्कलकोट, दि.९ : पंढरपूर येथील ब्ल्यू स्टार सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जेऊर प्रशालेचे शिक्षक तुकाराम दुपारगुडे
यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. दुपारगुडे हे २४ वर्षांपासून जेऊर येथील काशी विश्वेश्वर माध्यमिक प्रशालेत अध्यापनाचे कार्य करतात.त्यांना आता पर्यंत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत.त्यांनी पंढरपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला.व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा विमल बनसोडे,सचिव चंदन बनसोडे यांच्यासह भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान पालघरचे अध्यक्ष दिनेश भोईर,खादी ग्रामोद्योग चेअरमन शंकर गायकवाड,विस्तार अधिकारी मनीषा गायकवाड,ग्रामविकास अधिकारी
पदमजा खटावकर,रमाई बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता दुपारगुडे उपस्थित होते. यावेळी सत्कार ला उत्तर देताना दुपारगुडे म्हणाले की, या कार्यक्रमात ज्यांना ज्यांना हे पुरस्कार मिळाले ते सर्व पुरस्कार हे केवळ त्यांच्या आई-वडिलांच्या संस्कारामुळे मिळाले आहेत त्यामुळे पुढच्या वर्षापासून ब्लू स्टार सामाजिक संस्थेने आदर्श माता आणि
पिता हा पुरस्कार सुरू करावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या पुरस्कार वितरण सोहळ्यात अमरावती,उस्मानाबाद, बीड,रत्नागिरी, जळगाव ,पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील जवळपास तीस मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला.
यावेळी संस्थेचे इतर पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.