---Advertisement---

समाजकार्यात चपळगावातील पाटील परिवार नेहमी अग्रेसर; पाटील पिता-पुत्रांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

Follow Us:
---Advertisement---

 

 

अक्कलकोट, दि.७ : चपळगाव व परिसरात समाजकार्यात नेहमी आप्पासाहेब पाटील व अभिजीत पाटील यांचा परिवार पुढे असतो नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या विजयाने पाटील घराण्याचा नावलौकिक वाढला आहे,असे गौरवोद्गार चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी काढले.अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालकपदी आप्पासाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल तसेच युवा नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील परिवार व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
पाटील परिवाराने मनीषा कृषी उद्योगाच्या माध्यमातून समाजात व शेतकऱ्यांत वेगळे स्थान निर्माण केले आहे हे स्थान टिकवण्याचा प्रयत्न या परिवारामार्फत प्रामाणिकपणे केला जात आहे त्याला सर्वांची साथ आहे,असेही पाटील यावेळी म्हणाले.यावेळी तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील ,बसवराज बाणेगाव, चिदानंद हिरेमठ, मनोज इंगुले ,ज्ञानेश्वर कदम,सुरेश सुरवसे, लक्ष्मण पाटील, बसवराज बऱ्हाणपुरे, पंडित पाटील, खंडप्पा वाले,शरणू ख्याडे ,पिंटू भोसले ,गोकुळ मोरे ,राजा कोळी, मोहन दुलंगे, श्रीमंत इंगुले, विजय बिराजदार ,प्रदीप सुरवसे, सचिन म्हेत्रे ,अंबणा डोळळे, दिलीप बुगडे, अविनाश कदम ,केतन सुरवसे, रमेश शिंदे, संजय भोसले आदींसह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!