मुंबई: मान्सून संदर्भात हावामन विभागाने आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे अखे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे. यावेळी मान्सून तब्बल आठ दिवस उशिरा भारतात पोहोचला आहे. येत्या १६ तारखेपर्यंत महाराष्ट्रात त्याचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केले आहे.
यावेळी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊसाचा अंदाजदेखील हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या दोन दिवसांत मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन देशभरात वाटचाल होईल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.