---Advertisement---

भयानक..! प्रेयसीचे तुकडेकरून कुकरमध्ये शिजवून घातले कुत्र्याला ; मुंबईच्या मीरा रोड परिसरात घडली माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुंबईच्या मीरा रोड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. मीरा रोड याठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीने आपल्या ३२ वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केली व हत्येनंतर आरोपीने प्रेयसीचा मृतदेहाचे तुकडे कटरने करत ते कुकरमध्ये शिजवले आणि कुत्र्याला खायला घातल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मीरा रोडच्या गीतानगर फेज ७ मधील आकाशदीप इमारतीत हि घटना घडली आहे. याठिकाणी मनोज सहानी (५६ वर्ष) आणि सरस्वती वैद्य (३२ वर्ष) हे दोघंही लिव्ह एन मध्ये राहत होते. या इमारतीत दोघंही ३ वषांपासून भाड्याने वास्तव्य करत होते. दोघांमध्ये सतत किरकोळ कारणांवरून वाद होत असे. त्यामुळे मनोजने धारधार शस्त्राने हत्या करून आरोपीने मृतदेहाचे अनेक तुकडे करून काही तुकडे कुकरमध्ये शिजवून तर काही मिक्सर मध्ये बारीक करून कुत्र्याला खायला घातले.

आरोपीच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्यांना संशय आला व आरोपीच्या संशयास्पद हालचालींमुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!