---Advertisement---

भाजपचे नवे ७० जिल्हाध्यक्ष जाहीर;आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई, दि.१९ : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने २०२४ च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे,असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. सोलापूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती कायम करण्यात आली आहे तर सोलापूर शहराध्यक्षपदी नरेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण (माढा) जिल्हाध्यक्षपदी चेतन केदार सावंत यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!