दुधनी दि २१ : राज्यात घरगुतीसह व्यावसायिक वीज दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वीज दरवाढीचा फटका नियमित वीज बिल भरणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. अशात एखादा महिन्याचा वीज बिल आर्थिक अडचणीसह इतर कारणांमळे थकीत राहिल्यास थकीत बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून तगादा लावला जात आहे. यामुळे नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकाकडून महावितरण कंपनीवर संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा एखादा महिन्याचा बिल थकीत राहिल्यास थकीत बिल वसुलीसाठी वारंवार घरी येऊन बिल भरा अन्यथा तुमचं वीज पुरवठा खंडित केला जाईल, असे तगादा लावला जात आहे. मात्र शहरातील अनेक भागात सरास आकडे घालून वीज चोरी करून व्यवसाय करणारे किंवा घरगुतीसाठी वापर करणारे मात्र या वसुलीच्या तगाद्यापासून मुक्त आहेत. वीज चोरी करणाऱ्यांकडे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे, का असा सवाल नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून उपस्थीत केला जात आहे.
शहरातील मुख्य बाजार पेठेतील गांधी चौक परिसरातील अनेक दुकानामध्ये, मैंदर्गी नाका परिसरासह इतर काही भागात विद्युत केबल टाकण्यात आली नाही. याचा गैर फायदा त्या – त्या भागातील काही नागरिक घेत आहेत. मात्र ज्यांच्या घर आणि दुकानांमध्ये वीज मीटर आहे त्या ग्राहकाकडून एखादा महिन्याचा वीज बिल थकीत राहिल्यास त्यांच्याकडून थकीत बिल वसुलीसाठी कर्मचारी थेट घरी येऊन त्वरित बिल भरा अन्यथा दोन दिवसात तुमचं वीज कनेक्शन खंडित करू असे धमकी दिले जात आहे. मात्र त्याच गल्लीतून जाताना आकडे घालून वीज चोरी करणाऱ्यांवर मात्र कुठलीही कारवाई न करता डोळे झाकून निघून जातात.
या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यास हुक वापरणाऱ्यांवर कारवाईची आम्हाला अधिकार नाही. वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठीची वेगळी पथक आहे. ते त्यांचा काम आहे, कोण वीज चोरी करतंय? त्यांचं नाव लिहून द्या, फोटो काढून पाठवा, तुम्ही देखील आकडे घालून वीज वापरा असे सांगीतले जाते.
वीज चोरी करणाऱ्यांची नावे लिहून देणं, फोटो काढून पाठवण हे सर्व काम तक्रारदारकडून करून घेतले तर गले लठ्ठ पगार घेऊन वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी काय काम करतात असा सवाल नियमित बिल भरणर्या ग्राहकाकडून व्यक्त केला जात आहे.