ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खेडगी महाविद्यालयात होणार नव्या शैक्षणिक धोरणावर विचारमंथन; गटचर्चेतून नव्या शैक्षणिक धोरणांचे स्वागत

अक्कलकोट ,दि.२५ : अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी.खेडगी महाविद्यालयात केंद्र व राज्य शासन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहान्तर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यातुन नवीन शैक्षणिक धोरणावर विचारमंथन होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर होऊन २९ जुलै रोजी तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त २४ जुलै ते २९ जुलै हा सप्ताह साजरा केला जात असून २५ जुलै रोजी पत्रकारांसोबत गटचर्चा संप्पन्न झाली. या चर्चेत सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व समाजातील जाणकार मान्यवरांचा सहभाग होता. गुरुवार दि. २७ जुलै रोजी सोलापूर योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्या हस्ते नवीन शैक्षणिक धोरणाच्या चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे असणार आहेत. यावेळी पहिल्या सत्रात “नवीन शैक्षणिक धोरणाची रचना” या विषयावर सुलभा वठारे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट हे “नवीन शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता” या विषयावर बोलणार आहेत. शुक्रवार दि. २८ जुलै रोजी भित्तीपत्रक व घोषवाक्य स्पर्धा आयोजित केल्या असून पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी याकरिता सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांना यामध्ये सामावून घेतले जाणार आहे. या पत्रकार परिषदेस शिक्षण विस्तार अधिकारी प्रशांत आरबाळे, लायन्स क्लबचे राजशेखर कापसे, माजी अध्यक्ष विठ्ठल तेली, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद गंदगे, सचिव महेश जवळगी, निसर्गसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष सुनील बिराजदार, अक्कलकोट विकास विचार मंचचे सचिव संजीव बिराजदार, नीलकंठ कापसे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती समन्वयक प्रा. नीलकंठ धनशेट्टी, उपप्राचार्य प्रा. बसवराज चडचण, पर्यवेक्षिका प्रा. वैदेही वैद्य, डॉ. आय. एम. खैरदी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रकाश सुरवसे, डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी, प्रा. सिध्दाराम पाटील, डॉ. सिद्धार्थ मुरूमकर, डॉ. भैरप्पा कोणदे, डॉ. सोमनाथ राऊत, विरुपाक्ष कुंभार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!