ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट ; पॅसेंजर गाड्या रद्द चालू करण्याची मागणी

दुधनी : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पू उर्फ सातलिंगप्पा परमशेट्टी यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे – पाटील यांची मुंबई येथे भेट घेत निवेदन सादर केले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या निवेदनात नमूदकरण्यात आले आहे की, मागील तीन वर्षांपासून पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आले आहेत. पॅसेंजर गाड्या रद्द केल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसह नोकरदार वर्ग, शाळकरी मुलं – मुली यांना जिल्हा स्थळी जाण्यास मोठे अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी पॅसेंजर गाड्या त्वरित चालू करण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

दुधनी शहर हे व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठी बाजार पेठ आहे. दोन राष्ट्रीकृत बँक, एक नगरपरिषद, एक महावविद्यालाय, दोन खासगी शाळा आणि कन्नड, मराठी आणि उर्दू असे तीन जिल्हा परिषद शाळा आहेत. या शहरातील नागरिक व नोकरदार रोज सोलापूर, कलबुरगी, विजयपूरसह इतर जिल्ह्यात रोज शासकीय कामासह खासगी कामांसाठी रोज ये – जा करतात. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अनेक आडचणीचा सामना करावा लागत आहे. तरी पॅसेंजर गाड्या लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

यावेळी अडत – भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज परमशेट्टी, माजी नगरसेवक महेश पाटील, शंकर भांजी, बसवराज हौदे, शिवराज गुळगोंडा उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!