नागनाथ विधाते
दक्षिण सोलापूर, दि.६ : महसूल सप्ताहाच्या निमित्ताने दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात काल सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमांतर्गत सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या आणि त्या प्रशासनाकडून तत्पर सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात
आले.प्रांत अधिकारी विठ्ठल उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किरण जमदाडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन
केले होते.यावेळी नायब तहसीलदार राजाभाऊ
भंडारे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.प्रारंभी माजी सैनिक यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना तहसीलदार जमदाडे म्हणाले, भारत देशासाठी माजी सैनिकांनी जे योगदान दिले आहे त्यांच्या शौर्याच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा,हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्यांच्या यापुढे कोणत्याही तक्रारी असतील त्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करू.तसेच यापूर्वी ज्यांनी तक्रार किंवा अर्ज केला आहे त्यांचा पाठपुरावा करून सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
महिन्यातून एक दिवस केवळ सैनिकांच्या तक्रार निवारण्यासाठी देण्यात येईल,अशी घोषणा अधिकाऱ्यांनी केली. या निर्णयाची माजी सैनिकांनी स्वागत केले. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.