---Advertisement---

अंजनाबाई शिंदे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन;भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बलभीमभाऊ शिंदे यांना मातृशोक

Follow Us:
---Advertisement---

 

प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१ : तालुक्यातील दहिटणे गावचे माजी सरपंच तथा सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष बलभिमभाऊ शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती अंजनाबाई दत्तात्रय शिंदे (वय – १०० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना,नातवंडे असा परिवार आहे.त्या अक्कलकोट बाजार समितीचे माजी सभापती गोकुळ शिंदे यांच्याही मातोश्री व गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्या आज्जी होत. आपल्या तिन्ही मुलांना उद्योगधंद्यामध्ये आणण्यामध्ये आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यामागे अंजनाबाई यांचा मोठा वाटा होता सुरुवातीच्या काळामध्ये यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले होते म्हणून आज गोकुळ परिवारासारखा मोठा परिवार उभा राहिला आहे त्यांच्या निधनाने दहिटणे गावावर शोककळा पसरली आहे.त्यांची अंत्ययात्रा उद्या ( शनिवारी ) सकाळी ११ दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील राहत्या घरापासून निघणार आहे.अंत्यसंस्कार दहिटणे येथील शेतात होणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!