अक्कलकोट, दि.२६ : शेतकऱ्यांच्या
संकटात कायम पाठीशी उभे राहणारा कारखाना म्हणून गोकुळ शुगरची ओळख झालेली आहे आता शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करावे,
असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. मंगळवारी, धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरचा सन २०२३ – २४ चा ९ वा गळीत हंगाम आमदार कल्याणशेट्टी व त्यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडला.
त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गोकुळ शुगरवर मोठया प्रमाणात विश्वास आहे.नेहमी शेतक-याला आपला केंदबिंदु मानून आजपर्यंत गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी काम केले आहे.त्यामुळे नक्कीच यंदाच्या गळीत हंगामात देखील उच्चांकी गाळप करून शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देतील,असा विश्वास व्यक्त केला.प्रारंभी गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी आलेल्या प्रमुख अतिथींचे स्वागत करून सत्कार केला.यावेळी प्रमुख पाहुणे
म्हणून भाजपचे माजी जिल्हाअध्यक्ष शहाजी पवार, गोकुळ शुगरचे संस्थापक बलभिम शिंदे,तुळजाभवानी शेतकरी कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण, वळसंगचे पोलीस उपनिरिक्षक अनिल सनगले,प्रीती शिंदे,श्वेता शिंदे,कुसुम शिंदे,निकिता शिंदे,प्रदिप गायकवाड यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना चेअरमन दत्ता शिंदे म्हणाले की, गळीत हंगाम २०२३-२४ साठी प्रतिदीन ६ हजार मेट्रीक टन गाळप करून १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे.गाळप उदिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने आवश्यक ती मेंटेनन्सची सर्व कामे पूर्ण केली असून चारशे मोठया वाहनाचे व दोनशे मिनी कार्ट वाहनाचे करार करून संबधीत यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.यंदाच्या हंगामसाठी ऊसाला योग्य भाव देऊन प्रत्येक शेतक-याच्या कष्टाला योग्य मोबदला देण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.यावेळी बॉयलर पूजनासाठी खास पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे मुख्य पुजारी जोशी हे आपल्या ब्रह्मवृद्धांसह आले होते.त्यांनी विधिवत पूजा करून मंत्रोच्चाराचा जयघोष करीत श्री गणेशाची आरती करत पूजा पार पडली.यामुळे कारखाना परिसरातील वातावरण भारावून गेले होते.याप्रंसगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे, एक्झिकेटेव्ह डायरेक्टर प्रदिप पवार ,वर्क्स मॅनेजर राजकुमार लवटे, प्रोडक्शन मॅनेजर श्रीकांत भावसार,सिनिअर एच ॲन्ड टी मॅनेजर बालाजी
पाटील,शेती अधिकारी फकरुद्दीन जहागिरदार,अनिल खोचरे,शिवाजीराव पाटील,अंबणप्पा भंगे,अविनाश चव्हाण,मोतीराम राठोड, सागर संतानी,व्यंकट मोरे, कार्तिक पाटील, अभिजीत गुंड, राजू बंदीछोडे,अशपाक अगसापुरे,बाबा निंबाळकर,बसवराज बानेगाव,सिद्धाराम भंडारकवठे ,मोहन चव्हाण,राजू चव्हाण,महेश माने,उमेश पवार,राहुल काळे आदींसह कारखाना कार्यक्षेत्रातील इतर मान्यवर, पदाधिकारी व इतर सर्व खाते प्रमुख,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.