---Advertisement---

कत्तलीसाठी जाणाऱ्या गाईचे वाहन पोलिसांनी पकडले !

By team
On: November 23, 2023 2:25 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

वैराग तालुक्यातील धाराशिवकडे धामणगांव मार्गे कत्तलीसाठी तीन जर्सी गाई आणि तीन म्हशीची रेडके घेवून जाणारे पिकअप पकडून सुमारे दोन लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला. सदरचे पिकअप वाहन मंगळवार, दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास धामणगांव येथील नदीच्या पुलावर पकडले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी ८ सुमारास धामणगांव काटी मार्गी पिकअप (क्र एम.एच. ०६ एजी ८३०१) हे जात असताना थांबवले असता त्या वाहनामध्ये इस्माईल कुरेशी (वय २३, रा. काटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव), बाबु शेख (रा. काटी) या दोघांनी पिकअपच्या पाठीमागील हौदात क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने जनावरे कोंबून जनावरांना वेदना होईल. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!