ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिंगोलीत आज ओबीसी एल्गार महामेळावा : मंत्री भुजबळ कुणाचा घेणार समाचार !

हिंगोली : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर आज ओबीसी एल्गार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनाला मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आजच्या या सभेत भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सभेला राज्यभरातील ओबीसी बांधव उपस्थित राहणार असून, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा विश्वास आयोजकाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा देखील केला. तर, 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचे सरकारने म्हटले असल्याचा दावा देखील जरांगे यांच्याकडून केला जात आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून सरसकट आरक्षण देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे हा विरोध दाखवण्यासाठी आज हिंगोलीत भव्य ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!