---Advertisement---

सोलापूरजवळ भीषण अपघात : बस झाली उलटी तर आठ प्रवाशी जखमी !

By team
On: November 26, 2023 10:27 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला अपघात झाला असून सोलापुरातील उळे कासेगाव या ठिकाणी या एसटी बसचे मागचे चाके निखळले आणि बस पलटी झाली. सोलापूरहून नांदेडला निघालेल्या बसला पहाटे सहा वाजता अपघात झाला आहे.

सोलापूरहून येथून ही एसटी बस नांदेडकडे निघाली होती. या बसमधून किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोलापुरातील उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटून चाक निखळल्याने हा अपघात झाला. ही बस तिरकी होऊन रस्त्यावरच एसटी बस पलटी झाली. या अपघातामध्ये सात ते आठ लोक जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी आहेत. एसटी बसचा जॉईंट तुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!