ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री भुजबळांचा जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल !

हिंगोली | २६ नोव्हेबर २०२३ | राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरे करीत आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ हे देखील ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी अनेक जिल्ह्यात सभा घेवून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत असतांना राज्याचं लक्ष लागून असलेल्या हिंगोलीतील ओबीसी सभेला सुरुवात झाली असून, मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे यांचा समाचार घेतला आहे.

भुजबळ म्हणाले कि, मी काही बोललो की महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना वाटतं दोन समाजात तेढ निर्माण करतो. त्याच्या 15 सभा सभा झाल्यावर, आमची एकच सभा होत आहे. भुजबळ यांचा खुटा उपटून म्हणतो, मी काय केले खुटा उपटायला. आम्हाला रोज शिव्या दिल्या जात आहे. मला आलेल्या शिव्या गलिच्छ गलिच्छ होत्या. काही चॅनलवाले त्यांना म्हटलं तुमची हिंमत असेल तर वाचा. आणि महाराष्ट्राल कळू द्या मी चॅनलवाल्यांना सांगितलं. त्यांना पाच पंचवीस पानांचा मेसेज दिला. म्हणाले, आम्हाला वाचवत नाही. तुम्हाला एक शिवी वाचता येत नाही. मी आणि माझं कुटुंब दोन महिने या शिव्या वाचतो आणि ऐकतोय. आम्ही कसं जगायचं? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!