---Advertisement---

मंत्री भुजबळ हिंगोलीकडे जातांना ताफा अडवण्याचा प्रयत्न

By team
On: November 26, 2023 3:46 PM
Follow Us:
---Advertisement---

हिंगोली : वृत्तसंस्था

राज्यात ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ राज्यातील अनेक जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या सभा घेत आहे तर आज हिंगोलीतील रामलिला मैदानावर ओबीसी महासभा होणार असल्याने या सभेला मराठा बांधवांचा विरोध पाहायला मिळत असून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. याबाबत महत्वाची बातमी समोर आली असून छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हिंगोलीकडे जाताना छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्यात आला असून 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नांदेडच्या आर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे मराठा समाजाच्या तरुणांकडून भुजबळांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या ताफ्याला काळे झेंडेही दाखवले. पोलिसांनी या तरुणांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची ही सभा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य संघटनेने दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!