---Advertisement---

भर लग्नात चोरट्यांचा धुमाकूळ : ७ तोळे सोन्यासह लाख रुपये लंपास !

By team
On: November 29, 2023 9:09 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातील जाधववाडी रोड येथील भगवंत मंगल कार्यालय, , पुरंदावडे सदाशिवनगर येथील मंगल कार्यालयात विष्णू नारायण सिद यांची कन्या श्वेताली सिद यांच्या मातोश्री साडी बदलत असताना अज्ञात चोरट्यांनी नववधू व वरमाई यांचे ७ तोळे दागिने व १ लाख रुपये रक्कम असणारी बॅग लंपास केल्याची घटना मंगळवार दि. २८ रोजी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ६१ फाटा माळशिरस येथील विष्णू नारायण सिद यांच्या मुलीचा विवाह भगवंत मंगल कार्यालय जाधववाडी येथे होता. लग्न सोहळ्यापूर्वी श्वेताली सिद मातोश्री साडी बदलत असताना त्यांच्या जवळील बॅग बाजूला ठेवलेली होती. पाच मिनिटात साडी बदलण्याचे झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, सोने व पैसे असणारी बॅग गायब झालेली आहे. त्यामध्ये दोन मोबाईल होते. शोधाशोध केली, परंतु बॅग सापडली नाही. पोलीस स्टेशन येथे संपर्क करून मोबाईल नंबरवर ट्रेकिंग केले असता नातेपुतेकडे लोकेशन दाखवत होते. पोलिसांची शोधा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले जात आहेत. नातेपुतेवरून चोरटे जात असताना त्यांनी बॅगेमध्ये मोबाईल व दागिन्याचे मोकळे बॉक्स टाकून दागिने व रोख रक्कम घेऊन गेल्याचे समोर येत आहे. याबाबत माळशिरस पोलिसात उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!