मुंबई : वृत्तसंस्था
देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता आंतरराष्ट्रीय बाजारात रोज कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असतात. याचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होताना दिसतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या भावात फारसा बदल झालेला नाही.याचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव जाहीर झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल 77.67 डॉलरवर विकले जात आहे. तसेच ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 83.10 डॉलरवर विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या भावावर देशातील पेट्रोल डिझेलचे भाव ठरवले जातात. राज्यातील पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.
मुंबई
पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
दिल्ली
पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकत्ता
पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर
चैन्नई
पेट्रोल 102.74 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर