---Advertisement---

आता परदेशात देखील धुमाकूळ घालणार ‘झिम्मा २’

By team
On: November 30, 2023 4:33 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिम्माचा हा सीक्वल असून हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आहे. झिम्मानंतर या चित्रपटाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. अखेर २४ नोव्हेंबरला ‘झिम्मा २’ सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट सांगणारा हा सिनेमा पाहण्यासाठी खासकरुन महिला प्रेक्षक वर्ग सिनेमागृहात गर्दी करत आहे. ‘झिम्मा २’ची क्रेझ पाहता आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

प्रेक्षकांचा लाडका ‘झिम्मा २’ ओमान आणि बाहरेन या देशात प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मराठी पोरी सातासमुद्रापार कल्ला करताना दिसणार आहेत. ओमान आणि बाहरेन या देशातील काही शहरांमध्ये ‘झिम्मा २’चे शो लागणार आहेत. याबाबत एक व्हिडिओ हेमंत ढोमेकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत हेमंत ढोमे, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर परदेशातील या शोची माहिती देताना दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!