---Advertisement---

तारेवर कपडे टाकताना बसला शॉक : दुर्देवाने विवाहितेच जागीच मृत्यू !

By team
On: November 30, 2023 11:14 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे येथे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धुतलेले ओले कपडे अंगणात असलेल्या तारेवर टाकत असताना वरून गेलेल्या विजेच्या तारेला ओल्या साडीचा स्पर्श झाल्याने करंट बसून विवाहिता जागीच कोसळली. या घटनेत विवाहितेचा दुर्देवाने जागीच मृत्यू झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उळे येथील कोमल शंकर शिंदे (वय २८) ही विवाहित महिला सकाळी अकरा वाजता धुतलेले ओले कपडे घरातील अंगणात असलेल्या तारेवर वाळविण्यासाठी टाकत होती. रात्री पडून गेलेल्या मोठ्या पावसामुळे अंगणात मोठ्या प्रमाणात ओल निर्माण झाली होती. त्यात या महिलेने कपडे तारेवर टाकत असताना वरून गेलेल्या सर्विस तारेला साडीचा स्पर्श झाल्याने करंट उतरून ती महिला त्या तारेवरच चिटकून बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळली. ही घटना नातेवाईकांना कळली. तिला वाचवण्यासाठी दोन महिला पुढे सरसावल्या. परंतु ती जागीच कोसळल्याने त्या मागे सरकल्या. नणंद भाग्यश्री हिने तिला तात्काळ उपचाराकरता शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. विवाहित महिलेस लहान बाळ आहे. या घटनेने शिंदे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!