---Advertisement---

ठाकरे व हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला का ? भाजपचा हल्लाबोल !

By team
On: December 5, 2023 3:43 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले. चारपैकी तीन राज्यात सत्ता खेचून आणत भाजपने दणदणीत विजय मिळवला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. मात्र भाजपच्या या विजयावर उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमची शंका व्यक्त केली असून एवढा आत्मविश्वास आहे तर लोकसभा ही एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा भाजपने चांगलाच समाचार घेतला आहे.

कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका, उद्धव ठाकरे किती रडारड करणार? असा टोला भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. “उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे,” अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!