---Advertisement---

या राशीच्या लोकांनी प्रवास टाळावा : वाचा राशिभविष्य !

By team
On: December 7, 2023 9:24 AM
Follow Us:
---Advertisement---

मेष : खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. धन हानी होऊ शकते. तुमच्या उदार वागणुकीमुळे फसवणूक होण्याची शक्यता. जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात, त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे.

वृषभ : लांबचे प्रवास टाळा. खर्च वाढतील. कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगारेट पासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक आयुष्यातील सगळ्या तक्रारी दूर होतील.

मिथुन : वाद टाळा. आर्थिक लाभाची शक्यता. आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. तुम्ही तुमचे काम चोख केले आहे आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे.

कर्क : उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

सिंह : दिवस फारसा लाभदायक नाही. खर्चांवर मर्यादा घाला. कुटुंबिय अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.

कन्या : पैशांची काळजी घ्या. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

तूळ : पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ. स्वप्न साकारण्यासाठी पूर्ण लक्ष केंद्रीत करून मेहनत करण्याची गरज. कार्यालयात लोकांना आज कार्य-क्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदार तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

वृश्चिक : आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता. मित्रमैत्रिणींबरोबर सायंकाळ घालवणे तुमच्यासाठी खूपच सुखदायी करणारे ठरू शकते. कामाच्या ठिकाणी महत्वपूर्ण व्यक्तीशी सुसंवाद होईल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.
धनु : आर्थिक बचत कराल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. व्यवसायात नवी आघाडी सुरु करण्यासाठी शुभ दिवस. फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे वैवाहिक आयुष्यावर दुष्परिणाम होईल.

मकर : खर्चावर नियंत्रण मिळवा. ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. भागीदारांना कल्पना पटवून देताना खूप अडचणी येतील. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांना ही आनंद मिळेल.

कुंभ : आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता. जीवनसाथीच्या आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. जोडीदाराची एक अचंबित करणारी बाजू पाहणार आहात.

मीन : गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. व्यापारात नफा. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. वैवाहिक आयुष्यात प्रेमातील असीम आनंदाचा अनुभव मिळेल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!