---Advertisement---

‘ओबीसींचा भावी मुख्यमंत्री’ : भुजबळांचे बॅनर झळकले !

By team
On: December 8, 2023 4:08 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात राज्यभर ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे. इंदापुरातील या मेळाव्याआधीच मंत्री छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आहेत.

पुण्यातील इंदापुरात उद्या शनिवारी ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. या सभेला ओबीसीचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची पूर्ण तयारी झाली आहे. या मेळाव्याआधीच पुण्यातील इंदापूर तालुक्यात भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ असे बॅनर ठिकठिकाणी झळकू लागले आहेत. ओबीसी समाजातील अनेक नेते या एल्गार सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!