मेष : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करु शकतात. वैवाहिक आयुष्यातील सगळ्या तक्रारी दूर होतील.
वृषभ : आर्थिक लाभ होतील. जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. जोडीदारावरील तणाव वाढेल. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. काळजी घ्या.
मिथुन : आर्थिक काळजी घ्या. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्ती सोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. तुमच्या जोडीदाराला सरप्राईझ देत राहा.
कर्क : आर्थिक गोष्टी सांभाळा. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या मेहनतीचे चीज होऊन तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होईल.
सिंह : अर्थपुरवठा होत राहील. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. व्यावसायिकांना चांगला दिवस. तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल
कन्या : आर्थिक स्थिती सामान्य. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.
तूळ : धन लाभ होऊ शकतो. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. आयटी क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. जोडीदाराच्या वागण्यामुळे दिवसभर निराश असाल.
वृश्चिक : खर्च वाढतील. कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील.
धनु : जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. जोडीदार कोणत्याही भांडणाशिवाय शांत दिवस घालवाल.
मकर : धन लाभ होईल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या.
कुंभ : खर्च भागतील. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार करा. नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर करीअरमधील प्रगतीसाठी गरजेचे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल.
मीन : खर्चांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबिय अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा.