---Advertisement---

सोलापुरात खा.राऊतांच्या गाडीवर चप्पल फेकली !

By team
On: December 11, 2023 10:28 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. सायंकाळच्या सुमारास बाळे येथील एका कार्यक्रमासाठी ते आले होते. कार्यक्रम संपवून ते गाडीकडे परतत असताना प्रचंड गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने गर्दीतून चप्पल त्यांच्या वाहनाच्या दिशेने फेकल्यामुळे बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ना. नारायण राणे समर्थक सागर शिंदे यांनी ही चप्पल आपणच फेकली असल्याचा दावा केला आहे.

सायंकाळी ५.३० वाजता या कार्यक्रमाचे बाळे चौकात आयोजन करण्यात आले होते. मात्र खा. संजय राऊत यांचे ७ च्या सुमारास कार्यक्रम स्थळी आगमन झाले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. हा कार्यक्रम संपवून ते परतत असतांना हा प्रकार घडला. बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चप्पल फेकणाऱ्याचा घटनास्थळी शोध घेतला मात्र गर्दीमुळे तो मिळून आला नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!