ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जाहिरात केल्यास कायदा करण्यात येणार ; गृहमंत्र्यांनी सेलिब्रिटी व खेळाडूंना फटकारले !

नागपूर : वृत्तसंस्था

जगभरात सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक ऑनलाईन गेम सुरु असून यात अनेकन लोकांना आर्थिक फटका बसला आहे तर राज्यातील आ.बच्चू कडू यांनी नेहमीच यावर बंदी आणावी व खेळाडूनी हि जाहिरात करू नये अशीच भूमिका घेतली होती आज देखील हिवाळी अधिवेशनात आ.बच्चू कडू यांनी प्रश्न मांडला असता यावर गृहमंत्री फडणवीस यांनी मोठ वक्तव्य केले आहे.

ऑनलाईन बेटिंग ॲपवरून अनेक लोकांची फसवणूक होत असून या माध्यमातून गोळा केलेला पैसा बांधकाम प्रकल्पात गुंतविला जात आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी आणि युवकांचे आयकॉन असलेले लोक अशा ॲप्सच्या जाहिराती करतात, त्यामुळे अनेक युवक जुगाराच्या ॲप्सच्या अधीन होत आहेत, असा विषय महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला. बच्चू कडू यांनी मागच्या काही काळात ऑनलाईन ॲप्सची जाहिरात करणाऱ्या एका माजी खेळाडूविरोधात आंदोलन केले होते. आज त्यांनी कोणाचेही नाव न घेता, पुन्हा एकदा हा विषय मांडला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन बेटिंग ॲप्स आणि त्याच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना एक मोठे आवाहन केले.

“ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी केंद्राला कायदा करावा लागेल. ऑनलाईन गेमिंग ॲपची नोंदणी परकीय राष्ट्रात केलेली असते. त्यामुळे त्यावर बंदी घालणे अवघड होते. तसेच जाहिरातींमधून पैसे मिळतात म्हणून अनेक सेलिब्रिटी आणि आयकॉन समजली जाणारी मंडळी अशा ॲप्सच्या जाहिराती करतात. पण या लोकांनी जाहिराती करू नये, अशी विनंती सभागृहाच्या माध्यमातून करत आहे”, अशी भूमिका फडणवीस यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!