---Advertisement---

अखेर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

By team
On: December 18, 2023 11:15 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेल्याप्रकरणी डीडीएन कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १५) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास दळवे-पाटील दुकानाच्या कंपाऊंडलगत बाळे येथे घडली. या प्रकरणी चंद्रशेखर श्रीधर पवार (वय ६९, रा. पाटोदा, जि. धाराशिव) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून लातुरमधील मुरुडच्या डीडीएन कारखान्याचे शेतकी अधिकारी राजेश तवले-पाटील व त्यांच्यासोबत असणाऱ्या काही इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवार यांचा मुलगा ओंकार चंद्रशेखर पवार यांच्याबरोबर ऑगस्ट २०२३ मध्ये डीडीएन शुगर कारखान्याचे ऊसतोड करून तोड वाहतूक करणारा करार कारखान्याचे चेअरमन व कारखान्याचे शेतकी अधिकारी राजेश तवले-पाटील असे तिघांमध्ये शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर झाला होता. तसेच, १५ लाख रुपये करारापोटी मिळाले होते. मात्र, ओंकार पवार व कामगार ओंकार लोखंडे असे दोघे हार्वेस्टर मशीन बिघडल्याने मशिनरीचे सामान घेऊन येण्यासाठी बाळे येथील दुकानाजवळ आला असता, संशयित आरोपींनी बोलेरो जीपमध्ये येऊन ओंकार याला गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन नेले, असे फिर्यादीत नमूद आहे. हेडकॉन्स्टेबल भालशंकर तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!