---Advertisement---

मद्यधुंद तरुणाचा शहरात धिंगाणा : भररस्त्यावर तलवारी नाचवत दुकानाची केली तोडफोड !

By team
On: December 19, 2023 11:19 AM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील नाशिक शहर गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटनेने चर्चेत आले असतांना आता पुन्हा एकदा अशीच एक थरारक घटना घडली आहे. शहरातील दामोदर चौक परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने चांगलाच धिंगाणा घातला. हातात तलवार घेऊन या तरुणाने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. संताजपनक बाब म्हणजे या तरुणाची मुजोरी इतकी वाढली, की त्याने एका गर्भवती महिलेला धक्का देऊन खाली पाडलं. इतक्यावरच न थांबता त्याने परिसरातील दुकानांची देखील तोडफोड केली.

या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत तरुणाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी वेळीच धाव घेत या मद्यपी तरुणाला ताब्यात घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. हा संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दामोदर चौक हा शहरातील गजबजलेला परिसर आहे. नेहमी याठिकाणी नागरिकांची गर्दी असते.अशातच सोमवारी सायंकाळच्या सुमारास एक मद्यपी तरुण चौकात आला. त्याने भररस्त्यात तलवार नाचवत दहशत माजवली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना तलवारीचा धाव दाखवत परिसरातील दुकानांची तोडफोड केली.

याचवेळी समोरून येत असलेल्या एका गर्भवती महिलेला या तरुणाने धक्का देत खाली पाडले. सुदैवाने यात महिलेला कुठलीही दुखापत झाली नाही. दरम्यान हा सर्व प्रकार सुरू कुणीही या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. मद्यपी तरुण पाथर्डी येथील असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!