---Advertisement---

मूकबधिर विद्यार्थ्याच्या साक्षीने झाला स्वागत समारंभ

By team
On: December 21, 2023 2:52 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

समाजसेवेचे व्रत घेतलेले,जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद जोपासणारे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी आपला मुलगा चि.प्रथम व सून चि. सौ.कां.मिथिला(सृष्टी) यांच्या विवाहप्रीत्यर्थ आयोजित स्वागत समारंभात मूक-बधीर शाळेतील शंभर विद्यार्थी,वसतीगृहातील पन्नास विद्यार्थी आणि समर्थ नगर,अक्कलकोट येथील कल्पतरु वृध्दाश्रमातील लोकांना आमंत्रित करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

निर्सगरम्य सायंकाळी आयोजित स्वागत समारंभास त्यांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था देखील केली होती.यावेळी त्यांचे अंतःकरण पूर्वक स्वागत करण्यात आले.सर्वांनी अतीशय सुंदररित्या सजवलेल्या स्टेजवर वधूवरांना भेटून शुभेच्छा दिल्या.फोटोसेशन झाल्यानंतर सर्वांनी मिष्ठानाचा आस्वाद घेतला.नुकतेच कांही दिवसापूर्वी मुलगा प्रथम हा पद्मश्री प्रकाश बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील आश्रमास भेट दिले होते त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन येणाऱ्या काळात होणाऱ्या लग्नसमारंभात आपणही गोरगरीब वंचितांना आनंदीत करावे ही खूण-गाठ बांधून आपल्या जन्मदात्या पित्यासमोर विचार मांडले.क्षणाचाही विचार न करता होकार मिळाला मग दोघे मिळून सगळ्यांना आमंत्रित केले.स्वागत समारंभास उपस्थित सर्व पाहुणेमंडळी, आप्तेष्ट व मित्रमंडळींना या कृतीचे खूप कौतुक वाटले.यापुढे समाजातील सर्व घटकांनी आदर्श घ्यावे, भविष्यात अनुकरण करावे असे काम मसुती परिवाराने केले आहे.अश्या विधायक विचारसरणीच्या कुंटुंबाला व नव-दापंत्याला शहरातील अनेक मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!