---Advertisement---

पवार परिवारात ‘मॅच फिक्सिंग’ नाही : अजित पवार !

By team
On: December 23, 2023 9:30 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्यापासून अजित पवार दूर झाले आहे पण बाहेर पडल्यानंतर देखील त्यांनी शरद पवारांच्या भेटी घेतल्याने अनेक नेत्यासह कार्यकर्त्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण होत असल्याने आज अजित पवारांनी यावर भाष्य केले आहे.

पवार कुटुंब एकत्रित आले की आम्ही सारे राजकारणातही एकच आहोत, असा कार्यकर्त्यांचा गैरसमज होतो. आपण कशाला वाईटपणा घ्यायचा? पण, लक्षात घ्या, आपण आता खूप पुढे गेलो आहोत. पवार कुटुंबात कोणतेही ‘मॅच फिक्सिंग’ नाही, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केले. पक्षातील त्यांच्या गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येथे झाली. त्यावेळी पदाधिकाऱ्यां समोर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर काही कार्यक्रमांत ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्रित दिसले. त्यासंबंधी टिप्पणी करताना अजित पवार म्हणाले, कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावली म्हणजे आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र आलो, असे होत नाही. कोणी कोणाला ओवळतानाचा फोटो येतो आणि मग दबक्या आवाजात चर्चा सुरू होतात. मात्र प्रत्यक्षात तसे काही नाही. प्रत्येकाचा काम करण्याचा एक काळ असतो. वयोमानाप्रमाणे नवी पिढी पुढे येत असते. त्यांना मार्गदर्शन करावे लागते. पण काही जण ऐकायला तयार नव्हते, अशा शब्दात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राजकारणातील सक्रियतेवर टीका केली. आम्ही ‘कमळा’वर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. काहीजण जाणीवपूर्वक तशी बदनामी करत आहेत. पण आपण ‘कमळा ‘वर लढणार नाही; ‘घड्याळा ‘वरच लढणार, हेही त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!