ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगेनी गाजवले क्रिकेटचे मैदान !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरणारे मनोज जरांगे पाटील हे रविवारी मात्र निवांत दिसले यावेळी त्यांनी आंतरवाली‎सराटी येथे क्रिकेट खेळले. त्यांनी १५ धावा काढल्या.‎ तसेच निर्णायक विकेट घेत संघाला विजय मिळवून‎ दिला. दरम्यान, तब्येत खालावल्याने सायंकाळी त्यांना‎ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले.‎

आंतरवाली सराटी येथे रविवारी मनोज जरांगे यांनी‎ बॅट, बॉल हातात घेत क्रिकेटर म्हणून मैदान गाजवले.‎जरांगे ज्या टीमकडून खेळले त्यांचे ओपनिंग बॅट्समन‎होते. यात त्यांनी चार ओव्हरपर्यंत खेळून एक चौकार‎मारला. या व्यतिरिक्त ११ धावा काढल्या. संघाच्या १२‎ओव्हरमध्ये एकूण ५१ धावा झाल्या होत्या, तर दुसऱ्या‎टीमच्या बॅटिंगदरम्यान त्यांनी अंतिम टप्प्यातील ओव्हर‎घेत एक चौकार देऊन निर्णायक विकेट घेत आपल्या‎संघाला ४ धावांच्या फरकाने विजय मिळवून दिला.‎ मराठा समाजाला आरक्षण‎ मिळावे, यासाठी मनोज जरांगे‎पाटील हे आंदोलन करीत आहे.‎आरक्षणासाठी सभा अन् मैदान‎ गाजवणाऱ्या जरांगे पाटलांच्या‎खेळीने मैदानावरील तरुणही‎चांगलेच अवाक् झाल्याचे‎ पाहायला मिळाले.‎

‎मनोज जरांगे पाटील यांनी‎रात्रीच्या कीर्तनाचा समारोप‎झाल्यानंतर आंदोलनस्थळी‎तरुणांबरेाबर चर्चा सुरू असताना‎उद्या क्रिकेट खेळायला येणार‎असल्याचे सांगितले. रात्री‎ठरल्यानुसार सरपंच पांडुरंग‎तारख यांच्याबरोबर पांढरा‎पोशाख, जॅकेट अन् पायात शूज‎घालून जरांगे पाटील सकाळी‎सहा वाजता मैदानावर दाखल‎झाले. त्यांनी बॅटिंग‎करण्याबरोबरच बॉलिंग‎करण्याचाही आनंद लुटला.‎ मनोज जरांगे यांच्या बरोबर आंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारख पाटलांनी‎सकाळी सहा वाजता हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून दौरे‎तसेच सभा सुरू असल्याने मनोज जरांगे पाटील यांना व्यायाम करता‎आला नाही. यामुळे क्रिकेटच्या माध्यमातून मैदानावर थोडी कसरत‎करायची असल्याचे तरुणांना त्यांनी सांगितले होते.‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!