ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बापरे : पंगतीत मटणाची नळीच नसल्याने मोडले लग्न !

हैदराबाद : वृत्तसंस्था

अनेक लग्नकार्यांत मानापमान नाट्य रंगल्याचे आपण पाहिले आहे. अनेकदा जेवणावरूनही वादविवाद होतात; परंतु वन्हाडींना पंगतीत मटणाची नळीच वाढली नसल्यामुळे लग्न मोडल्याची अजब घटना तेलंगणाच्या हैदराबादमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगतियाल येथील मुलगा असून मुलगी निजामाबादमधील राहणारी आहे, नोव्हेंबर महिन्यात मुलीच्या घरीच साखरपुडा झाला. वधूपक्षाकडील लोकांनी पाहुण्यांसाठी मांसाहारी बेत ठेवला होता. परंतु जेवणात मटणाची नळी नसल्याची तक्रार वर पक्षातील लोकांनी केली.

साखरपुड्यापूर्वी झालेल्या बोलणीत जेवणाच्या पदार्थांमध्ये मटणाच्या नळीचा समावेश नव्हता, असा दावा मुलीकडील लोकांनी केला. परंतु इतका वाढला की अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस अधिकाऱ्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना वाद मिटवण्याचा सल्ला दिला; परंतु ते पोलिसांनाही जुमानत नव्हते. बोलणी झाली तेव्हा मेन्यूत मटणाची नळी असेल, असे ठरले होते. परंतु मुलीकडील लोकांनी जाणीवपूर्वक मेन्यूतून मटण नळी रद्द करत आमचा अपमान केला, असे वरपक्षाचे म्हणणे होते. अखेर मुलाच्या कुटुंबीयांनी साखरपुडा अर्थात सोडत लग्न मोडल्याचे जाहीर केले. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी ही घटना तेलुगू चित्रपटातील एका प्रसंगासारखी असल्याचे सांगितले. मार्च महिन्यात रिलीज झालेल्या ‘बालागम’ चित्रपटात मटणाच्या नळीवरून दोन कुटुंबांत वाद होऊन लग्न मोडल्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!