ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अपात्रतेच निर्णय दिल्लीतून झालाय : खा.राऊतांचा आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय येत्या काही तासांवर येऊन ठेपला असताना नुकतेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप सरकारवर केला आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झाला आहे. सर्वकाही आधीपासूनच फिक्स झालं आहे, त्यामुळे आजच्या निकालाची केवळ औपचारिकताच आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारीला महाराष्ट्रात रोड शो करणार आहे. तर आमदार अपात्रतेचा निकाल असल्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर जाणार आहे. याचाच अर्थ असा आहे की, दोघांनाही मॅच फिक्सिंगबाबत पूर्ण माहिती आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!