---Advertisement---

सरकारने घेतली मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धास्ती

By team
On: January 16, 2024 2:50 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक पवित्रा घेत आहे. तर येत्या काही दिवसात मराठा आंदोलनाचा लढा आणखी तीव्र होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत धडकणार असून या आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. अशातच आता राज्य सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन मुंबईमध्ये धडकणार आहे. मात्र मनोज जरंगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार असूनराज्य सरकारकडून जरंगे यांची समजूत काढण्यासठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लक्ष ठेऊन आहेत, त्यामुळे मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, मराठा आरक्षणावर राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार असल्याचीही माहिती विश्वसनीय सुत्रांनी सांगितली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!