नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसापासून जगभरातील बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत दर वाढ होत असतांना आता आज घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज सकाळी ६ वाजता WTI क्रूड प्रति बॅरल $ 72.66 वर तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 78.15 वर व्यवहार करत आहे.
देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. भारतात रोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. मिळालेल्या माहितीनुसार २०२४ च्या निवडणूकांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल होऊ शकतात असे केंद्र सरकारने सांगितले होते. परंतु, अद्याप यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. अशातच आज महाराष्ट्र पेट्रोल-डिझेलचा भाव घसरला आहे.
हिमाचल प्रदेशात पेट्रोल २६ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महागले आहे. गोवा, केरळ आणि तेलंगणामध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 50 पैशांनी तर डिझेल 46 पैशांनी स्वस्त झालं आहे. जाणून घेऊया महानगर आणि राज्यातील आजचा भाव
चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 06.31 रुपये. आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर