मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांच्या मागे या ना त्या कारणामुळे अनेक संकटे येत असतांना नुकतेच आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे सूरज चव्हाण यांना अटक झाली असल्याची बातमी समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिकेत कोविडकाळात १३२ कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्यात सूरज चव्हाण यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. दरम्यान सूरज चव्हाण यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. खिचडी घोटाळाच्या आरोपांनंतर काही महिन्यांपूर्वी ईडीने मुंबईत सात ठिकाणी छापेमारी केली होती. यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सूरज चव्हाण यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता.
शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. कोविड काळात स्थलांतरीत मजुरांना खिडची वाटपाचा निर्णय हा तत्कालिन ठाकरे सरकारने घेतला होता. यासाठी विविध कंपन्यांना कंत्राटं देण्यात आली होती. यातील एका कंपनीत सूरज चव्हाण यांच सहभाग होता. आज सकाळी चव्हाण यांना चौकशीसाठी बोलावलं होतं, चौकशीत सहभाग निश्चित झाल्यानंतर चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.