---Advertisement---

काशी गंगा घाटावर करणार अक्कलकोट शिवसेना महाआरती

By team
On: January 18, 2024 3:11 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

येत्या गुरुवार दि.२२ जानेवारी रोजी अयोध्येत रामजन्मभूमी येथे भव्य मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गेल्या पाचशे वर्षा पासुन चाललेल्या हिंदु जनतेच्या संघर्षाचा विजय होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी त्यादिवशी दिवाळी साजरी करा व रात्री दिवे लाऊन महाआरती करा असे आवाहन केले आहे .त्याना प्रतिसाद देत अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यानी काशी येथील गंगाघाटावर अक्कलकोट तालुका शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात येणार असुन अक्कलकोट तालुक्यातून तीस महिला व दहा पुरुष व शिवसैनिक असे चाळीस जण काशीला जाणार आहेत असे म्हणाले. शुक्रवारी रात्री अक्कलकोटहुन काशी कडे निघतील.
काशीमधे जंगमवाडी मठाला भेट देऊन जगद्गुरू डाॅ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी व मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांचे दर्शन घेऊन काशी विश्वनाथाचे दर्शन घेणार आहेत. २२ तारखेला रात्री काशी येथे गंगाघाटावर महाआरती करणार आहेत असे संजय देशमुख म्हणाले. संजय देशमुख यांनी हा भव्य दिव्य उपक्रम राबवून हिंदु संस्कृती जपण्याचे व राजकारणा बरोबर धार्मिक व सामाजिक कार्याची उत्तम आयोजन केले आहे असे शिवसेना विधानसभा संघटक प्रा.सुर्यकांत कडबगावकर म्हणाले. यावेळी कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे, उपतालुकाप्रमुख बसवराज बिराजदार , महिला आघाडी वर्षा चव्हाण, शहरप्रमुख वैशाली हावनूर, विजय मलंग, महिबुब शाबादे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!