सोलापूर : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्यात राज्यात दुसरा दौरा सोलापूर येथे सुरु असून याठिकाणी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती होती.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक देखील झाले होते. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झाले. मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळाले हवे होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले, मी तुम्हाला तुमच्या घराची चावी देण्यासाठी आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे.
सोलापुरात असंघटित आणि विडी कामगारांसाठी 350 एकर परिसर, 834 इमारती, 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत तयार करण्यात आली आहे. या वसाहतीच्या लोकार्पणावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनिक झाले. कामगारांना घरे मिळाली याचा मला आनंद झाला आहे. घर मिळालेल्या लोकांनी समज्योत लावावी, से पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. मोदी म्हणाले की, पंढरपुरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराजांना नमस्कार करतोय असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजकारण आरोप-प्रत्योरोप होत असतो. परंतु आमचा मार्ग विकास आहे. यामुळे देशातील चार कोटी लोकांना आम्ही पक्के घरे देऊ शकलो. या लोकांना किती आनंद झाला हे त्यांनाच विचारा. देशात दीर्घकाळपर्यंत गरीबी हाटव नारे लावले गेले. परंतु गरीबी गेली नाही. कारण गरीबांच्या नावावर योजना होत होत्या. परंतु त्याचा लाभ योग्य लाभार्थीला मिळत नव्हता. म्हणजे आधी सरकारची नीती, निष्ठा आरोपीच्या पिंजऱ्यात होती. परंतु आता तुम्ही बघितलेले दिवस तुमच्या मुलांना बघायला मिळणार नाही. झोपडीऐवजी आता पक्के घरात तुम्हाला राहण्यास मिळणार आहे.