---Advertisement---

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

By team
On: January 19, 2024 11:11 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात गेल्या काही महिन्यापासून अनेक दिग्गज नेत्यांना जीवे ठार मारण्याच्या अनेक धमकी येत असल्याचे समोर येत असतांना आता खलिस्तान समर्थक आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पन्नूने एक ऑडिओ संदेश पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, पोलिसांनी अयोध्येत 2 खलिस्तान समर्थक तरुणांना अटक केली आहे. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला जात आहे.

22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यात तुम्हाला (मुख्यमंत्री योगी) SFJपासून कोणीही वाचवू शकणार नाही, असे म्हटले आहे. गरज पडल्यास राजकीय हत्या करू. SFJ यावर 22 जानेवारीला उत्तर देईल. 24 तासांत अयोध्येतील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी 3 संशयितांना अटक केली आहे. सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएम योगी यांना धमक्या देणारा मेसेजमध्ये व्हॉईस रेकॉर्डिंग पाठवण्यात आले आहे. हे रेकॉर्डिंग युनायटेड किंगडम (यूके) मधील एका ठिकाणाहून सापडले. सध्या या संदेशाशी संबंधित सर्व बाबी तपासल्या जात आहेत. अटक करण्यात आलेल्या तीन तरुणांची सुरक्षा एजन्सी लवकरच चौकशी करू शकते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!