---Advertisement---

हुकुमशाहीच्या हातात पुढील पिढ्या देण्याचे पाप करू नका : ठाकरेंचा हल्लाबोल

By team
On: February 2, 2024 2:45 PM
Follow Us:
---Advertisement---

रायगड : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी राज्यभर दौरे सुरु केला असून अनेक मतदार संघात उमेदवारांमध्ये मोठी चुरस दिसत आहे. नुकतेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील रायगड जिल्ह्यात दौऱ्यावर निघाले आहे. त्यांनी आपल्या भाषणात भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले कि, पक्ष चोरणारे, फोडणारे, हिंदूंमध्ये भेदभाव करणारे तुमचे हिंदुत्व आहे का? मी हुकूमशाहीला हिंदुत्व मानणार नाही. मत तुमचे आणि किंमत त्यांना, हे चालणार नाही. तुम्हाला आता हिम्मत दाखवावी लागेल. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना म्हटले की, पुढील पिढ्या हुकूमशहांच्या हातात देण्याचे पाप करू नका.

मी कालपासून इथे आहे मी काय काय केले हे गिते साहेबांनी सांगितले. कोरोना काळात मी माझ कुटुंब माझी जबाबदारीची घोषणा केली होती पण त्याने पण काहींना डोकेदुखी आहे. काहीजण दारात जातात, तेव्हा लोक म्हणतात अरे हड… असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली आहे. रायगडने अनेकांना झुकवले आहे, तानाजी मालुसरे यांची ही भूमी आहे. इथे झेंडा बाजूला आणि नॅपकिन पुढे पुढे. जॅकेट घेतली पण काहीही झाले नाही भावी पालकमंत्री म्हणूनच राहिले, असे म्हणत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यावरही ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!