---Advertisement---

महाराष्ट्रात गुंडा राज : राऊतांनी केले फोटो व्हायरल

By team
On: February 6, 2024 10:15 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतांना आता ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी अनेक आरोप सरकारवर केले आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यातील एका गुंडासोबतचा फोटो समोर आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट करून महाराष्ट्रात गुंडा राज सुरू असल्याचा हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांचे ट्विट नेमके काय?
संजय राऊतांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘महाराष्ट्रात गुंडा राज! गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने…’ असे म्हणत राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.

यापूर्वी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो समोर आला होता. त्यानंतर आता पुण्यातील गुंड निलेश घायवळआणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था पाहता सत्ताधारी नेतेच गुंडांना आश्रय देत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!