---Advertisement---

‘आगे आगे देखो, होता है क्या…. ; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

By team
On: February 13, 2024 10:55 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने वाटचाल करतो आहे, त्यामुळे जनाधार असलेले नेते पक्षात गुदमरत आहेत. हे चित्र देशभर आहे. त्यामुळेच अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ज्यांचा जनतेशी संपर्क आहे, अशा सर्वच पक्षांचे बडे नेते आमच्या संपर्कात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासयात्रेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे, ‘आगे आगे देखो, होता है क्या…. असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सोमवारी मुंबईत केले.

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्र. ८२ मध्ये दोन वेळा काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेले जगदीश कुट्टी अमिन आणि वॉर्ड क्र. २१६ चे माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड, भालचंद्र शिरसाट, अमरजीत मिश्रा, मुरजी पटेल आदी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा सोमवारी राजीनामा दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!