---Advertisement---

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण करणार भाजपात प्रवेश

By team
On: February 13, 2024 11:11 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात कॉंग्रेस पक्षाचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दि.१२ रोजी पक्षाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली होती, आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करु, असे त्यांनी सांगितले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात असल्याचं वक्तव्य केले होते. आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी भाजपच्या कार्यलयात जय्यत तयारी सुरु आहे.

आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांच्यासह राजूरकरांचा भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश पार पडणार आहे. अशोक चव्हाण, अमर राजूरकर यांचा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थित पार पडणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. आमदार अमर राजूरकर हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच भाजपमध्ये जाणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!