---Advertisement---

पेंट कारखान्यात भीषण आग : 11 जणांचा मृत्यू

By team
On: February 16, 2024 9:11 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच गुरुवारी दिल्लीतील अलीपूर येथील दयाल मार्केटमध्ये असलेल्या एका पेंट कारखान्यात भीषण आग लागली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर 4 जण जखमी झाले आहेत. मृतांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना राजा हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. रात्री ९ वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी सुमित भारद्वाज यांनी सांगितले की, स्फोट होताच बाहेर लोक जमा झाले. बादलीतून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र आग विझत नव्हती. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तीन मार्गाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. कारखाना सुमारे 8-10 वर्षे जुना आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!