---Advertisement---

मोदींचे कार्यकर्त्यांना आवाहन : ३७० जागा हीच खरी मुखर्जीना श्रद्धांजली

By team
On: February 18, 2024 10:09 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ३७० जागा जिंकून देण्यासाठी तन-मनाने झटण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी कार्यकर्त्यांना केले. या ३७० जागा हीच पक्षाचे विचारक श्यामाप्रसाद मुखर्जीना श्रद्धांजली ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय अधिवेशनापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी भगवी टोपी घातलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत मंडपम येथे पोहोचताच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डांसह इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ‘मोदी, मोदी’चा जयघोष सुरू केला. तत्पूर्वी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केल्याची माहिती पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७० जागा जिंकायच्या आहेत, असे महत्त्वाचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमक्ष ठेवल्याचे तावडेंनी सांगितले. ३७० हा केवळ आकडा नसून ही श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाला दिलेली श्रद्धांजली ठरेल,

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!