---Advertisement---

सरकार पडणार नाही ; उद्योगमंत्री सामंत

By team
On: February 24, 2024 9:14 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवले आहे. त्यावरून अजय महाराज बारस्कर यांनी त्यांच्यापासून बाजूला जात त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांचा हा अंतर्गत वाद असून यामध्ये सरकार पडणार नाही, असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून २४ ते २६ दरम्यान मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेशन सेंटर येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना मराठा आंदोलनाबाबत विचारले असता त्यांनी मनोज जरांगे पाटील व अजय महाराज बारस्कर यांच्यामध्ये सरकार पडणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही. कारण इम्पिरिकल डाटा गोळा करण्यात काही अडचणी आल्या होत्या. मात्र, आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या अभ्यासाने हे आरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी सव्हें केला आहे. तसेच पूर्ण अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने दिलेले हे आरक्षण टिकणारे आहे ते न्यायालयात टिकणारच आहे. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यामधूनच अजय महाराज बारस्कर व जरांगे पाटील यांच्यात मतभेद झाले आहेत. मात्र, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये सरकारने पडण्याची काहीच गरज नसल्याचे सामंत म्हणाले. प्रदर्शनाबाबत माहिती देताना उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये प्रथमच डिफेन्स एक्स्पो होत आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!